Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
5th Standard Marathi Digest Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Textbook Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
विठ्ठलचा जन्म कोठे झाला?
उत्तर:
विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला.
प्रश्न (आ)
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
उत्तर:
विठ्ठल हुतुतू, खो-खो, सुरपारंब्या हे खेळ खेळत असे.
प्रश्न (इ)
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?
उत्तर:
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटले.
प्रश्न (ई)
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?
उत्तरः
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाजसुधारणा करण्याचे कार्य केले.
2. योग्य पर्याय ‘✓’ निवडून लिहा.
प्रश्न 1.
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ……………………..
(अ) तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे.
(आ) तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.
उत्तरः
कारण तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.
प्रश्न 2.
जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा ……………………..
(अ) विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.
(आ) भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले.
उत्तरः
तेव्हा विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.
3. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न 1.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) जन्म
(आ) आवड
उत्तरः
(अ) मृत्यू
(आ) नावड
4. कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
प्रश्न 1.
कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
(अ) डोंगर पर्वतापेक्षा ………………. आहे. (मोठा)
(आ) हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ……………… झाला. (दुःख)
(इ) ससा हा प्राणी ……………….असतो. (धीट)
(ई) राजूला ……………….कपडे आवडत नाहीत. (सैल)
(उ) वीणा …………….. चालते. (भरपूर)
उत्तरः
(अ) लहान
(आ) आनंद
(इ) भित्रा
(ई) घट्ट
(उ) हळूहळू
5. खालील शब्द वाचा व असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतुतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, हृदय.
6. तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
• खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Additional Important Questions and Answers
प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.
- अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव काय होते?
- अण्णासाहेबांच्या आईचे नाव काय होते?
- विठ्ठलचे वडील कोणत्या वृत्तीचे होते?
- विठ्ठलच्या आजोबांचे नाव काय होते?
- विठ्ठलच्या मळ्यात कोणते पीक आले होते?
- विठ्ठलजेवायला बसला असताना तेथे कोण आले?
- विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या गोष्टीचा अखंड ध्यास घेतला?
उत्तर:
- रामजी
- यमुनाबाई
- धार्मिक
- वसंतराव
- मका
- भिकारी
- समाजसुधारणेचा
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
विठ्ठलचा जन्म कोठे झाला?
उत्तर:
विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला.
प्रश्न 2.
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
उत्तर:
विठ्ठल हुतुतू, खो-खो, सुरपारंब्या हे खेळ खेळत असे.
प्रश्न 3.
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?
उत्तर:
विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटले.
प्रश्न 4.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?
उत्तरः
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाजसुधारणा करण्याचे कार्य केले.
प्रश्न 5.
लहानपणीच्या खेळांमध्ये विठ्ठलचे कोणते गुण दिसून येत असत?
उत्तर:
लहानपणीच्या खेळांमध्ये विठ्ठलचे धीटपणा व सोशीकता हे गुण दिसून येत असत.
प्रश्न 6.
लहानग्या विठ्ठलच्या मनावर कोणता संस्कार उमटला होता?
उत्तर:
लहानग्या विठ्ठलच्या मनावर ‘माणसामाणसांत भेद करणे योग्य नाही’, हा संस्कार उमटला होता.
प्रश्न 7.
छोटा विठ्ठल चार वर्षांचा असताना दक्षिण भारतात काय झाले?
उत्तर:
छोटा विठ्ठल चार वर्षांचा असताना दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला.
प्रश्न 8.
विठ्ठल यांना लोकं कोणत्या नावाने आजही ओळखतात?
उत्तर:
विठ्ठल यांना लोकं अण्णासाहेब शिंदे’ या नावाने आजही ओळखतात.
प्रश्न 9.
रिकाम्या जागा भरा.
- विठ्ठल यांचा जन्म …………………… गावी झाला.
- लहानग्या विठ्ठलला अत्यंत आवड होती.
- त्यांचे वडील ……………….. वृत्तीचे होते.
- सर्व ………….. लोक त्यांच्या घरी येत असत.
- दक्षिण भारतात महाभयंकर ……………………… पडला होता.
- विठ्ठलच्या ………. मक्याचे चांगले पीक आलेले होते.
- आजोबा वसंतराव ………………….. होते
- लोक विठ्ठलचे ……………………… करत व …………………… देत.
उत्तर:
- जमखंडी
- खेळाची
- धार्मिक
- जातिधर्मांचे
- दुष्काळ
- मळ्यात
- दानशूर
- कौतुक, आशीर्वाद
योग्य पर्याय निवडून लिहा.
प्रश्न 1.
विठ्ठलच्या हृदयावर
(अ) संत एकनाथांच्या भारुडाचा ठसा उमटला होता.
(आ) संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता.
उत्तरः
संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा उमटला होता.
प्रश्न 2.
विठ्ठल ……………………. खेळात सदैव पुढे असे.
(अ) हुतूतू, खोखो
(आ) कबड्डी, लंगडी
उत्तरः
हुतूतू, खोखो
प्रश्न 3.
आयुष्यभर विठ्ठलने ध्यास घेतला.
(अ) लेखनाचा ध्यास घेतला
(आ) समाजसुधारणेचा ध्यास घेतला
उत्तरः
समाजसुधारणेचा ध्यास घेतला
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
वडिलांच्या धार्मिक वृत्तीचा व घरातील वातावरणाचा परिणाम विठ्ठलवर कसा झाला होता?
उत्तर:
विठ्ठलचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जातिधर्मांचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसामाणसांत भेद करणे योग्य नाही, याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला.
प्रश्न 2.
विठ्ठलचा दयाळूपणा कोणत्या प्रसंगावरून दिसून येतो?
उत्तर:
एकदा विठ्ठल जेवायला बसला होता. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. विठ्ठलाने क्षणाचाही विचार न करता आपल्या समोरील ताट त्या भुकेल्या भिकाऱ्याला दिले. या प्रसंगावरून विठ्ठलाचा दयाळूपणा दिसून येतो.
प्रश्न 3.
पाठात आलेल्या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ लिहा व समजून घ्या.
उत्तर:
हा अभंग साधु म्हणजेच सज्जन माणसांच्या लक्षणाविषयी आहे. यात म्हटले आहे की, जे गरिबीने पिडलेले व गांजलेले आहेत, त्यांना आपला मानणारा जो आहे, तोच सज्जन आहे. देव त्यांच्याच ठायी आहे. देव तिथेच आहे. देवळात किंवा मूर्तीत नाही.
प्रश्न 4.
विठ्ठलचे कोणकोणते गुण या पाठात दिसून येतात?
उत्तर:
लहानपणीच्या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येते. धार्मिकता, दयाळूपणा, समाजाविषयी आस्था हे गुण विठ्ठलच्या वाढत्या वयात दिसून येतात.
प्रश्न 5.
आजोबांचा दानशूरपणा विठ्ठलमध्ये कोणत्या गोष्टींवरून दिसून येतो?
उत्तर:
विठ्ठल चार वर्षांचा असताना दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण त्यांच्या मळ्यात मात्र मक्याचे चांगले पीक आलेले होते. त्याचे आजोबा दानशूर होते. रोज सकाळी ते कट्ट्यावर बसत व गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. त्यावेळी विठ्ठलही त्यांना या कामात मदत करत असे, या गोष्टीवरून आजोबांचा दानशूरपणा विठ्ठलमध्ये दिसून येतो.
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- दानशूर
- लहान
- दुष्काळ
- दयाळू
- भेद
- चांगले
- गरीब
- कौतुक
- धार्मिक
- आशीर्वाद
उत्तरः
- कंजूष
- मोठे
- सुकाळ
- दुष्ट
- साम्य
- वाईट
- श्रीमंत
- निंदा
- अधार्मिक
- शाप
प्रश्न 2.
समानार्थी शब्द लिहा.
- गाव
- आई
- वडील
- सदैव
- भेदः
- मन
- गरीब
- कौतुक
- आयुष्य
उत्तर:
- खेडे
- जननी
- बाबा, पिता
- नेहमी
- फरक
- चित्त
- दरिद्री
- स्तुती
- जीवन
प्रश्न 3.
लिंग बदला.
- वडील
- छोटा
- आजोबा
- भिकारी
उत्तरः
- आई
- छोटी
- आजी
- भिकारीण
प्रश्न 4.
वचन बदला.
- गाव
- आवड
- वृत्ती
- घर
- जात
- भेद
- मन
- पीक
- दाणा
- मदत
- ताट
- ठसा
- कार्य
उत्तर:
- गावे
- आवडी
- वृत्ती
- घरं/घरे
- जाती
- भेद
- मने
- पिके
- दाणे
- मदत
- ताटे
- ठसे
- कार्ये
प्रश्न 5.
कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
- त्या वर्षी गावात ……………………… पाऊस पडला. (अल्प)
- सोनालीने ……………………….. वाकून पाहिले (बाहेर)
- साठवून ठेवलेल्या …………………….. गवताला आग लागली. (ओल्या )
- राहुलने …………………………… गणित सोडवले. (सोपे)
- राजा …………………….. आहे. (कंजूष)
- बाबांनी आईच्या बोलण्याकडे ………………………… केले. (लक्ष)
- कार्यक्रमाचा ………………………… चांगला झाला. (सुरुवात)
- गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही सोन्याची …………………. केली. (विक्री)
उत्तरः
- अती
- आत
- सुक्या
- कठीण
- दानशूर
- दुर्लक्ष
- शेवट
- खरेदी
प्रश्न 6.
पुढील देशभक्तांच्या घोषणा लिहा.
उत्तरः
देशभक्त | घोषणा |
1. महात्मा गांधी | करो या मरो। |
2. लोकमान्य टिळक | स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. |
3. नेताजी शुभाषचंद्र बोस | तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा । |
4. लालबहादूर शास्त्री | जय जवान, जय किसान। |
5. चाचा नेहरू | आराम हराम है। |
6. इंदिरा गांधी | गरीबी हटाओ। |
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी गावात 23 एप्रिल 1873 रोजी झाला.महर्षी शिंदे यांनी सामाजिक व धार्मिक कार्यात आपले आयुष्य वेचले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता व सामाजिक समानता घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. महर्षी शिंदे यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल स्पेन्सर हर्बर्ट आणि मॅक्सम्युलर या इंग्रजी विचारवंतांचा प्रभाव होता. विठ्ठल शिंदे यांनी कलाशाखेच्या पदवीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविदयालयात घेतले. महात्मा गांधी व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर विठ्ठल शिंदे यांनी काम केले. 2 जानेवारी 1944 रोजी विठ्ठल शिंदे यांचे निधन झाले.
प्रश्न 2.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म केव्हा व कुठे झाला?
उत्तर:
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी गावात 23 एप्रिल 1873 रोजी झाला.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Summary in Marathi
पक्ष्यपरिचय:
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती प्रस्तुत पाठात सांगितली आहे.
शब्दार्थ:
- सदैव – नेहमी (always, ever)
- धीटपणा – साहसी, धैर्यशाली (courageous, fearless)
- सहनशीलता- सोशिकता (tolerance)
- धार्मिक – पुण्यवान, सदाचारी (religious)
- वृत्ती – आचरण, वागणूक (behaviour, conduct)
- परिणाम – प्रभाव (an effect, an impression)
- भेद – फरक, भिन्नता (a discrimination)
- उमटणे – स्पष्ट दिसणे (to be clear)
- महाभयंकर – भितिदायक (fearful, dreadful)
- दुष्काळ – अन्नाची टंचाई, दुर्भिक्ष (a famine)
- मळा – बागाईत, भाजी पिकवण्याचे ठिकाण (a vegetable garden)
- दानशूर – उदार मनाचा (generous, liberal)
- आशीर्वाद – शुभेच्छा, दुवा (blessings)
- भिकारी – भिक मागून जगणारा (a beggar)
- दयाळूपणा – दुसऱ्यावर दया करण्याचा स्वभाव, प्रेमळपणा (kindness)
- अभंगवाणी – काव्यरचनेचा एक प्रकार (a species of verse)
- हृदय – मन (heart)
- आयुष्य – जीवितकाळ (life-time)
- समाजसुधारणा – समाजहितासाठी आरंभलेले कार्य (social service)
- अखंड – अविरत (continuous, an ending)
- ध्यास – अतिशय उत्कट इच्छा (a great longing)
- कार्य – योगदान, एखादया क्षेत्रात घातलेली भर/ कामगिरी (a contribution to the enrichment of a certain field)