Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 10 बाबांचं पत्र Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 10 बाबांचं पत्र Textbook Questions and Answers

1. एका शब्दात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
(अ) कठीण गेलेला पेपर
(आ) वैष्णवीला पत्र लिहणारे
(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण
(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ
उत्तर:
(अ) कठीण गेलेला पेपर – गणित
(आ) वैष्णवीला पत्र लिहणारे – बाबा
(इ) परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण – आंतरिक गुण
(ई) वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ – पुस्तके

2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?
उत्तर:
‘सहामाही परीक्षेत गणिताचा पेपर खूपच कठीण गेल्यामुळे वैष्णवी फार निराश झाली आहे’ हा निरोप आईने बाबांना दूरध्वनीवरून दिला.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

प्रश्न आ.
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
उत्तर:
बाबांना वैष्णवीशी हितगुज करावेसे वाटले, म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही.

प्रश्न इ.
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
उत्तर:
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी वैष्णवीला सांगितले की, गणिताचा पेपर कठीण गेला, म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना! मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. ‘अगं, एखादया विषयात गुण कमी पडले, तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही.

तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल.’ हा उपाय सुचवला.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

3. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 1

प्रश्न 1.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 1
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 2

4. खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 3

प्रश्न 1.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 3
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 4

5.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 5
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 6

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 7
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 8

6. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा. 

प्रश्न 1.
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
उत्तर:

  1. पत्रपेटी
  2. टपालगाडी
  3. कुरिअर
  4. ईमेल
  5. विमान

7. दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.

प्रश्न 1.
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
उत्तरः

  1. प्रथम मी नवीन कपडे विकत घेणार,
  2. बाबांना सोबत घेऊन फटाके विकत घेणार.
  3. आई बरोबर मामाच्या गावी जाणार.
  4. आई व आजी यांना फराळ बनवण्यात मदत करणार.
  5. मित्रांबरोबर मोकळ्या अंगणात फटाके वाजवणार.
  6. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करेन.
  7. मित्रांसोबत घराच्या अंगणात मातीचा किल्ला तयार करणार.
  8. किल्ल्यावर शिवाजी महाराज व इतर शिपाई यांची मांडणी करणार.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

8. तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 9

प्रश्न 1.
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
उत्तर:
प्रिय सुप्रिया, अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन!!!
तुझा पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक आला हे ऐकून खूप अभिमान वाटला.
असेच यश तुझ्या वाट्याला पुढे पुढे येवो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना….

9. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा. 

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 10

प्रश्न 1.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
उत्तर:
1. सुख आणि दुःख यांना सारखेच सामोरे जावे,
2. संकटांना जो धैर्याने तोंड देतो, तोच जीवनात विजयी होतो.

प्रकल्प: साने गुरुजी यांचे ‘सुंदर पत्रे’ हे पुस्तक मिळवा. वाचा. त्यातील तुम्हांला आवडलेली पत्रे सुरेख अक्षरांत लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

प्रश्न 2.
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा.
(टवटवीत, उंच, नवा, शंभर)
(अ) हिमालय ………… पर्वत आहे.
(आ) कंपास घ्यायला आईने मला ……………. रुपये दिले.
(इ) बागेत ………….. फुले आहेत.
(ई) ताईने मला …………..’ सदरा दिला.
उत्तर:
(अ) उंच
(आ) शंभर
(इ) टवटवीत
(ई) नवा

आपण समजून घेऊया.

प्रश्न 3.
खालील तक्ता वाचा. समजून घ्या.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र 11

उत्तर:

वाक्ये क्रियापदे काळ
1. सुनीताने बोरे खाल्ली. खाल्ली भूतकाळ
2. मी क्रिकेटची मॅच पाहीन. पाहीन भविष्यकाळ
3. सुधीर पत्र लिहीत आहे. आहे वर्तमानकाळ
4. वनिता गोड गाणे गाते. गाते वर्तमानकाळ
5. आईने कादंबरी वाचली. वाचली भूतकाळ

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांतील काळ ओळखता येतो.
काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

  1. वर्तमानकाळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 10 बाबांचं पत्र Important Additional Questions and Answers

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
बाबांनी वैष्णवीला कोणत्या विषयाशी मैत्री करायला सांगितले आहे?
उत्तर:
बाबांनी वैष्णवीला गणित विषयाशी मैत्री करायला सांगितले आहे.

प्रश्न 2.
परीक्षेतील गुण किंवा श्रेणी पेक्षा अजून कोणती गोष्ट महत्त्वाची आहे?
उत्तर:
परीक्षेतील गुण किंवा श्रेणी पेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

प्रश्न 3.
स्वत:मधील गुणांची वाढ करण्याकरिता प्रत्येकाने काय केले पाहिजे?
उत्तर:
स्वत:मधील गुणांची वाढ करण्याकरिता प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे.

प्रश्न 4.
दिवाळीच्या सुट्टीत बाबा कुठे येणार आहेत?
उत्तर:
दिवाळीच्या सुट्टीत बाबा गावी येणार आहेत.

प्रश्न 5.
गावी येताना बाबा वैष्णवीसाठी काय आणणार आहेत?
उत्तर:
गावी येताना बाबा वैष्णवीसाठी खाऊ आणणार आहेत.

प्रश्न 6.
बाबा गावी येताना वैष्णवीसाठी कोणती पुस्तके आणणार आहेत?
उत्तर:
बाबा गावी येताना वैष्णवीसाठी गोष्टीची पुस्तके आणणार आहेत.

बाबांचं पत्र Summary in Marathi

पाठपरिचय:

हे एक वडिलांनी आपल्या मुलीला लिहिलेले सांत्वनपर पत्र आहे. आपल्या मुलीला गणिताचा पेपर अवघड गेल्यामुळे आलेली | निराशा वडीलांनी अतिशय सहजतेने कशी दूर करण्याचा प्रयत्न केला, त्याचे हे पत्र म्हणजे एक सुंदर उदाहरण आहे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 10 बाबांचं पत्र

शब्दार्थ:

  1. प्रिय – प्रेमळ (dear)
  2. शुभ – मंगलदायक, पवित्र (holy)
  3. पुरता – पुरेसा (enough)
  4. गुरफटणे – गुंतून राहणे (involve, entangled)
  5. निराश – नाराज (disappointed)
  6. हितगुज करणे – मनातील गोष्ट सांगणे (to chat)
  7. विपरीत – वाईट (bad)
  8. संबोध – मूळ संकल्पना (concept)
  9. सराव – कृती (practice)
  10. लाडका – आवडीचा (favourite)
  11. आंतरिक – आतील गुण (internal qualities)
  12. उत्तम – अधिक चांगले (very good)
  13. नृत्य – नाच (dance)
  14. जोपासणे – सांभाळणे (to keep safe, to look after)
  15. पुरेपूर – पूर्णपणे (completely)
  16. खात्री – विस्वास (belief, trust)
  17. भेटीअंती – भेट झाल्यानंतर (after meeting)

वाक्प्रचार व अर्थ:

  1. निराश होणे – नाराज होणे.
  2. हितगुज करणे – मनातील गोष्ट सांगणे.
  3. विपरीत परिणाम होणे – वाईट परिणाम होणे.
  4. संधी मिळणे – वाव मिळणे.
  5. खात्री असणे – विश्वास असणे.