Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 15 नदीचे गाणे

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 15 नदीचे गाणे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 15 नदीचे गाणे

5th Standard Marathi Digest Chapter 15 नदीचे गाणे Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मंजुळ गाणे कोण गाते?
उत्तर:
मंजूळ गाणे नदी गाते.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 15 नदीचे गाणे

प्रश्न 2.
गावे कोठे वसली आहेत?
उत्तर:
गावे नदीच्या तीरावर वसली आहेत.

प्रश्न 3.
नदीवर शीतल छाया कोण धरते?
उत्तर:
नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात.

प्रश्न 4.
नदी जेथे जाईल तेथे काय करेल?
उत्तर:
नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेल.

2. कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
फुलवेली मज …………………………. देती,
कुठे …………………… खेळत बसती,
कुठे ……………………… माझ्यावरती
……………………. अपुली छाया धरती.
उत्तरः
फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 15 नदीचे गाणे

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

अ ‘गट’ब ‘गट’
1. झुळझुळ(अ) गाणे
2. मंजूळ(आ) छाया
3. शीतल(इ) पाणी

उत्तरः

अ ‘गट’ब ‘गट’
1. झुळझुळ(इ) पाणी
2. मंजूळ(अ) गाणे
3. शीतल(आ) छाया

4. हे शब्द असेच लिहा.

प्रश्न 1.
हे शब्द असेच लिहा.
उत्तर:

  1. मंजूळ – मधुर
  2. शीतल – थंड
  3. लव्हाळी – लव्हाळं
  4. लतावृक्ष – आंब्याचे झाड.
  5. लव्हाळी – पहिल्या पावसानंतर लतावृक्ष बहरून गेले.
  6. आम्रतरू – पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती

5. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.

प्रश्न 1.
कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.
उत्तर:

  1. नदीच्या तीरावरती गावे वसली आहेत.
  2. नदीकाठी झाडे, वेली दिसत आहेत.
  3. गुरे-वासरे नदीचे पाणी पित आहेत.
  4. मुले लाटांवरती खेळ खेळत आहेत.
  5. बायका नदीचे पाणी मडक्यात भरून नेत आहे.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 15 नदीचे गाणे Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
नदीला सुमने कोण देतात?
उत्तर:
नदीला सुमने फुलवेली देतात.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 15 नदीचे गाणे

प्रश्न 2.
नदीत कोण खेळत आहेत?
उत्तर:
नदीत लव्हाळी खेळत आहेत.

प्रश्न 3.
घटात काय भरतात?
उत्तर:
घटात पाणी भरतात.

प्रश्न 4.
नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी कोण येतात?
उत्तर:
नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गुरे-वासरे येतात.

प्रश्न 5.
मुले कुठे खेळतात?
उत्तर:
मुले लाटांवर खेळतात.

प्रश्न 6.
‘नदीचे गाणे’ कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘नदीचे गाणे’ कवितेचे कवी ‘वि. म. कुलकर्णी आहेत.

प्रश्न 7.
नदी कोणाची आहे?
उत्तर:
नदी सर्वांची आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 15 नदीचे गाणे

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
पाणी पिऊनी ………………………….. जाती,
……………….. भरुनी कोणी ………………….. नेती,
…………………….. जवळी येती,
मुले खेळती ……………………….
उत्तरः
पाणी पिउनी पक्षी जाती,
घट भरुनी कोणी जल नेती,
गुरे-वासरे जवळी येती,
मुले खेळती लाटांवरती.

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कवितेत नदीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तरः
नदी ही दरी, वनातून वाहते. ती झुळझुळ वाहते. तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत. अनेक वृक्षवेली नदीच्या काठावर आहेत. आंब्याची झाडे नदीवर सावली धरतात. अनेक पक्षी आपली तहान भागवतात. कुणी नदीवर पाणी भरण्यासाठी येतात. गुरे-वासरे नदीवर येतात. मुले तिच्या लाटांवर खेळतात. नदी ही सर्वांची आहे. नदी जिथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवते. अशाप्रकारे कवितेते नदीचे वर्णन केले आहे.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. गाव
  2. तरू
  3. छाया
  4. धती
  5. लाट
  6. आनंद
  7. वन
  8. लता
  9. आम्र
  10. बाग
  11. गुरे
  12. नदी
  13. मनोहर
  14. पक्षी
  15. जल
  16. घट
  17. सुमन

उत्तर:

  1. ग्राम
  2. झाड
  3. सावली
  4. धरणी
  5. तरंग
  6. हर्ष
  7. रान
  8. वेली
  9. आंबा
  10. उदयान
  11. जनावरे
  12. सरिता
  13. सुंदर
  14. खग
  15. पाणी
  16. माठ, मडके
  17. फूल

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 15 नदीचे गाणे

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. मंजूळ
  2. पुढे
  3. शीतल
  4. जाणे
  5. जवळ
  6. मला
  7. बसणे
  8. छाया
  9. जाईन
  10. आनंद

उत्तरः

  1. कर्कश
  2. मागे
  3. उष्ण
  4. येणे
  5. दूर
  6. तुला
  7. उठणे
  8. ऊन/सूर्यप्रकाश
  9. येईन
  10. दु:ख

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. दरी
  2. वन
  3. गाणे
  4. गाव
  5. काठ
  6. फुले
  7. लाटा
  8. बाग
  9. सुमने
  10. वासरू
  11. मुले
  12. फुलवेली

उत्तर:

  1. दऱ्या
  2. वने
  3. गाणी
  4. गावे
  5. काठ
  6. फूल
  7. लाट
  8. बागा
  9. सुमन
  10. वासरे
  11. मूल
  12. फुलवेल

प्रश्न 4.
शब्दाचे अर्थ लिहा.
उत्तर:
घट – मातीचा घडा (माठ)

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 15 नदीचे गाणे

प्रश्न 5.
पुढील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य बनवा.
जसे – झुळझुळ. नदी झुळझुळ वाहते.
उत्तर:
1. शीतल – झाडे शीतल छाया देतात.
2. मनोहर – निसर्गाच्या मनोहर दृश्याने सारेच मंत्रमुग्ध झाले.
3. मंजूळ – रमाने सर्वांसमोर मंजुळ गाणे म्हटले.

नदीचे गाणे Summary in Marathi

पदयपरिचय:

या कवितेत कवी वि. म. कुलकर्णी यांनी नदीचे मनोगत व नदीकाठच्या जीवनाचे सुंदर वर्णन केले आहे.

शब्दार्थ:

  1. दरी – दोन टेकड्यांमधील खोलगट भाग – (a valley)
  2. वन – जंगल, अरण्य (forest)
  3. झुळझुळ – मंदपणे, हळुवारपणे (softly)
  4. मंजुळ – मधुर, सुरेल (a sweet, melodious)
  5. वसणे – राहणे (to stay)
  6. तीर – काठ (shore)
  7. लता – वेल (creeper)
  8. वृक्ष – झाड (a tree)
  9. भूमी – जमिन (land)
  10. सुमने – चांगले, पवित्र मन (clean mind)
  11. लव्हाळी – पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती (rush like grass)
  12. आम्रतरू – आंब्याचे झाड (a mango tree)
  13. शीतल – गार (cool)
  14. छाया – सावली (shadow)
  15. घट – घडा, घागर (a vessel for holding water)
  16. गुरे – गाय, बैल इ. जनावरे (cattle)
  17. वासरू – गाईचे पारडू (a calf)
  18. लाटा – लहरी (waves)
  19. मनोहर – आकर्षक (attractive)

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 5 डराव डराव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 5 डराव डराव

5th Standard Marathi Digest Chapter 5 डराव डराव Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
डराव डराव आवाज कोण करीत आहे?
उत्तर:
डराव डराव आवाज बेडूक करीत आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

प्रश्न (आ)
तलाव का भरला?
उत्तर:
धो धो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला.

प्रश्न (इ)
बेडकाचे डोळे कसे आहे?
उत्तर:
बेडकाचे डोळे बटबटीत आहे.

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1.जोराचा पाऊस(अ) गाठा अपुला गाव
2. बेडकाचे मोठे डोळे(आ) धो-धो पाऊस
3. पूर्ण भरलेला तलाव(इ) बटबटीत डोळे
4. स्वत:च्या गावी परत जा(ई) तुडुंब भरला तलाव

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1.जोराचा पाऊस(आ) धो-धो पाऊस
2. बेडकाचे मोठे डोळे(इ) बटबटीत डोळे
3. पूर्ण भरलेला तलाव(ई) तुडुंब भरला तलाव
4. स्वत:च्या गावी परत जा(अ) गाठा अपुला गाव

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

3. गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव 1
उत्तर:

  1. छन्छन्
  2. छुमछुम्
  3. ढमढम्
  4. घणघण्
  5. कड्कड्
  6. खळखळ्
  7. किणकिण्

4. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?

प्रश्न 1.
पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?
उत्तरः
पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, जहाज, बोट ही साधने वापरतात.

5. पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?

प्रश्न 1.
पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
उत्तर:
पावसात भिजू नये, यासाठी आम्ही छत्री, रेनकोट, रेनशिटर वापरतो.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

6. निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.

प्रश्न 1.
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
(अ) वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज
(आ) उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज
(इ) तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज
उत्तर:
(अ) सळसळ
(आ) फडफडाट
(इ) तडतड

7. छत्रीचे चित्र काढा. रंगवा.

प्रश्न 1.
वाचा. लक्षात ठेवा.
‘नाव’ हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे.
नाव – वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव.
नाव – होडी.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 5 डराव डराव Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दात लिहा.

  1. बेडकाचा आवाज कसा आहे?
  2. बेडकाचा पत्ता कधी नव्हता?
  3. पाऊस कसा पडला?
  4. पाऊस किती पडला?
  5. तलाव कसा भरला?
  6. बेडकाचे डोळे कसे आहेत?
  7. मुलीच्या हातात काय दिसत आहे?
  8. बेडूक कुठे बसला आहे?

उत्तरः

  1. डराव डराव
  2. कालपर्यंत
  3. धो धो
  4. फार
  5. तुडुंब
  6. बटबटीत
  7. कागदाची होडी
  8. मोठ्या दगडावर

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
डराव डराव आवाज कोण करीत आहे?
उत्तर:
डराव डराव आवाज बेडूक करीत आहे.

प्रश्न 2.
बेडकाला नाव कोण विचारत होते?
उत्तर:
बेडकाला नाव कवितेतील मुलगी विचारत होती.

प्रश्न 3.
मुलगी बेडकाला काय सल्ला देत आहे?
उत्तर:
मुलगी बेडकाला ‘जा, गाठा जा, अपुला गाव’ असा सल्ला देत आहे.

प्रश्न 4.
‘डराव डराव’ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘डराव डराव’ या कवितेचे कवी ‘ग. ह. पाटील’ आहेत.

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
धो धो ………………………………..
…………………………
…………………………
………………………………. डराव!
उत्तर:
धो धो पाऊस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव.
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

प्रश्न 2.
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.

  1. वह्यांची पाने फाडताना होणारा आवाज
  2. झुकझुक गाडीचा आवाज
  3. सुतार लाकूड कापताना होणारा आवाज

उत्तर:

  1. टर्रर……
  2. झुकझुक
  3. खर्रखरी

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. बेडूक
  2. पाऊस
  3. तलाव
  4. नाव
  5. डोळे
  6. गाव

उत्तर:

  1. मंडूक
  2. वर्षा
  3. जलाशय
  4. नौका, होडी
  5. नेत्र, नयन
  6. खेडे, ग्राम

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. काल
  2. फार
  3. तुमच्या
  4. घ्या
  5. गाव

उत्तर:

  1. आज
  2. कमी
  3. आमच्या
  4. दया
  5. शहर

प्रश्न 3.
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

  1. गाव
  2. तलाव
  3. राव

उत्तर:

  1. नाव
  2. नाव
  3. डराव

प्रश्न 4.
वचन बदला.

  1. पत्ता
  2. नाव
  3. तलाव
  4. नाव
  5. डोळे
  6. छत्री
  7. गाव

उत्तर:

  1. पत्ते
  2. नावे
  3. तलाव
  4. नावा
  5. डोळा
  6. छत्र्या
  7. गावे

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

प्रश्न 5.
एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द लिहा.

  1. नाव – (Name) , नाव – बोट (Boat)
  2. सूत – धागा (Thread) , सुत – मुलगा (son)
  3. दिन – दिवस – (a day) , दीन – गरीब – (poor)
  4. रवी – सूर्य – (Sun) , रवी – घुसळण्याचे साधन (a churner)

डराव डराव Summary in Marathi

पदयपरिचय:

पावसाळ्याच्या दिवसात बेडकाचे डराव-डराव ओरडणे सुरू होते. बेडूक आणि लहान मुलगी यांच्यातील पावसातील काल्पनिक संवादाचे वर्णन कवी ‘ग. ह. पाटील’ यांनी ‘डराव डराव!’ या कवितेत केले आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव

शब्दार्थ:

  1. डराव – बेडकाचा आवाज (frog sound)
  2. ओरडणे – मोठ्याने बोलणे (To shout)
  3. फार – अतिशय मोठ्या प्रमाणात (exceedingly)
  4. तुडुंब – काठोकाठ (full of)
  5. तलाव – तळे (Pond)
  6. जाहली – झाली
  7. नाव – होडी (Boat)
  8. आणिक – आणि (and)
  9. बटबटीत – मोठाले, विद्रूप (very big eyes)
  10. ध्यान – विशिष्ट रूप (particular look)
  11. विचित्र – साधारण नसलेले (uncommon)
  12. छत्री – (umbrella)
  13. गाठणे – पोहचणे (to reach)
  14. थांबवणे – (to stop)
  15. अपुला – आपला, स्वतःचा (Our own)

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे?

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे?

5th Standard Marathi Digest Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Textbook Questions and Answers

1. रिकाम्या जाग भरा.

प्रश्न 1.
रिकाम्या जाग भरा.
(अ) …………………………… ” घेऊ सावली.
………………………………. पासुन जगणे.
(आ) ……………………………… एक शिकूया.
…………………………………… जीव जगूया.
उत्तर:
(अ) झाडापासून, मातीपासून
(आ) प्रभातकाळी, जगवित

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे

2. कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील कोणापासून काय घेता येईल ते लिहा.
(अ) सूर्य
(आ) चंद्र
(इ) तारा
(ई) फूल
(उ) कोकिळ
(ऊ) झरा
(ए) झाड
(ऐ) माती
उत्तर:
(अ) रंग
(आ) शांती
(इ) दिव्य कांती
(ई) गंध
(उ) गाणे
(ऊ) नवे तराणे
(ए) सावली
(ऐ) जगणे

3. कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे आणखी काही शब्द माहीत करून घ्या व लिहा.

प्रश्न 1.
कवितेत ‘चमचम’ शब्द आलेला आहे. यासारखे आणखी काही शब्द माहीत करून घ्या व लिहा.
उत्तर:

  1. घमघम
  2. कटकट
  3. लटपट
  4. छमछम
  5. सरसर
  6. फडफड
  7. कटकट
  8. भरभर
  9. लटपट
  10. झरझर.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
निसर्गाचे विविध घटक कोणते?
उत्तरः
सूर्य, चंद्र, तारे, आकाश, वृक्ष, पक्षी, माती, पाऊस हे सर्व निसर्गाचे घटक आहेत.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे

प्रश्न 2.
तुम्ही कधी निसर्गातील घटकांचा अनुभव घेतला आहे का? कशाप्रमाणे?
उत्तर:
हो. पौर्णिमेच्या रात्री चांदण्या बघण्याचा, रिमझिम पावसात भिजण्याचा आम्ही अनुभव घेतला आहे.

प्रश्न 3.
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही काय करता?
उत्तर:
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आम्ही झाडे लावतो, पक्ष्यांचे जीव वाचवतो, पाणी जपून वापरतो.

प्रश्न 4.
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?
उत्तर:
‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेच्या कवयित्री ‘निलम माणगावे’ आहेत.

प्रश्न 5.
प्रभातकाळी काय शिकूया?
उत्तरः
प्रभातकाळी जीव जगवत जगूया.

प्रश्न 6.
संध्यासमयी काय करूया?
उत्तर:
संध्याकाळी सारे मित्र एक होऊन हसूया.

प्रश्न 7.
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा.
1. …………………………. ” ताऱ्यापासून
……………………………… घेऊया कांती.
2. ……………………… एक होऊनी.
…………………………… मित्र हसूया.
उत्तर:
1. चमचमणाऱ्या, दिव्य
2. संध्यासमयी, सारे

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे

प्रश्न 8.
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
फुलापासून ……………………….
……………………………… तराणे
उत्तर:
फुलापासून गंध घेऊया .
कोकिळाकडून गाणे
झुळझुळणाऱ्या झऱ्यापासुनी
घेऊ नवे तराणे

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. शांती
  2. गंध
  3. नवे
  4. ऊन
  5. जीवन
  6. प्रभात
  7. हसणे
  8. एक
  9. सकाळ

उत्तर:

  1. अशांती
  2. दुर्गंध
  3. जुने
  4. सावली
  5. मरण
  6. संध्या
  7. रडणे
  8. अनेक
  9. संध्याकाळ

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे

प्रश्न 2.
वचन बदला

  1. तारा
  2. ढग
  3. फूल
  4. मित्र
  5. सावली
  6. झाड
  7. झरा
  8. गाणे

उत्तर:

  1. तारे
  2. ढग
  3. फुले
  4. मित्र
  5. सावल्या
  6. झाडे
  7. झरे
  8. गाणी

प्रश्न 3.
लिंग बदला.

  1. मित्र
  2. कोकीळा
  3. मुले

उत्तर:

  1. मैत्रीण
  2. कोकीळ
  3. मुली

कोणापासून काय घ्यावे? Summary in Marathi

पदयपरिचय:

संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही घेत असतो (शिकत असतो.) त्याचप्रमाणे निसर्गातील घटकांकडूनही घेण्यासारखे काहीना काही असते. हाच संदेश कवयित्री आपल्याला या कवितेद्वारे देत आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 8 कोणापासून काय घ्यावे

शब्दार्थ:

  1. सूर्य – एक ग्रह (the Sun)
  2. रंग – वर्ण (colour)
  3. दिव्य – दैवी (devine)
  4. कांती – लकाकी (shine)
  5. फुले – पुष्पे (flowers)
  6. गंध – सुवास (smell)
  7. झरा – निर्झर (spring)
  8. गडगडणे – मेघगर्जना (thundering)
  9. तराणे – मंजूळ गाणे (a meldious songs)
  10. प्रभात – सकाळ (morning)
  11. संध्या – संध्याकाळ (evening)
  12. कोकिळ – एक गाणारा पक्षी (the cuckoo)
  13. माती – मृत्तिका (soil)
  14. शांती – शांतता (calmness)
  15. सावली – छाया (shadow)
  16. जीव – प्राण (living being)

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 3 खेळूया शब्दांशी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

5th Standard Marathi Digest Chapter 3 खेळूया शब्दांशी Textbook Questions and Answers

1. वाचा. सांगा. जिंका.

प्रश्न 1.
वाचा. सांगा. जिंका.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी 1
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी 2

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(संदर्भासाठी पाठ्यपुस्तक पान नं 4 पहावे.)

प्रश्न 1.
मराठी स्वरमालेत किती स्वर आहेत?
उत्तर:
मराठी स्वरमालेत एकूण 12 स्वर आहेत. (‘अः’ हा स्वर इथे दिलेला नाही.)

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

प्रश्न 2.
मराठीत किती व्यंजने आहेत?
उत्तर:
मराठीत एकूण बत्तीस व्यंजने आहेत.

प्रश्न 3.
मराठीत अनुनासिके किती आहेत?
उत्तर:
मराठीत पाच अनुनासिके आहेत.

प्रश्न 4.
स्वरांपासून सुरू होणारी कोणती चित्रे या खेळात दाखविली आहेत?
उत्तर:
अननस, इमारत, अंगठा, औषध, ऊस, ओठ.

प्रश्न 5.
अकारान्ती वर्णांची कोणती चित्रे दाखविली आहेत?
उत्तर:
अननस, गवत, कमळ, घर, मगर, बदक

प्रश्न 6.
अनुस्वार असलेली कोणती चित्रे दाखविली आहेत?
उत्तर:
अंगठा, पतंग

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

2. योग्य जोड्या लावा.

प्रश्न 1.
योग्य जोड्या लावा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी 3
उत्तर:

  1. ई .

प्रश्न 3.
खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर भरा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी 4
उत्तर:

  1. आ, इ
  2. ख, घ
  3. छ, ज
  4. थ, द, न
  5. फ, ब, म
  6. र, व, श
  7. श, स, ह, ळ
  8. क्ष

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

प्रश्न 4.
पुढील अक्षरांपासून 2-2 शब्द लिहा.
उत्तर:

  1. अ – अननस – अमर
  2. आ – आरसा – आग
  3. इ – इरले – इमान
  4. ई – ईद – ईशान्य
  5. उ – उकाडा – उखाणा
  6. ऊ – ऊन – ऊठ
  7. ए – एकदम – एकत्र
  8. ऐ – ऐरण – ऐनक
  9. ओ – ओठ – ओटा
  10. औ – औषध – औत
  11. अं – अंगठा – अंगठी
  12. क – कपाट – कमळ
  13. ख – खग – खरं
  14. ग – गवत – गरज
  15. घ – घर – घरटे
  16. च – चमचा – चपाती
  17. छ – छत्री – छमछम
  18. ज – जहाज – जडण
  19. झ – झबले – झाड
  20. ट – टरबूज – टरफल
  21. ठ – ठसा – ठग
  22. ड – डबा – डमरू
  23. ढ – ढग – ढकल
  24. त – तलवार – तवा
  25. थ – थवा – थाट
  26. द – दम – दरवाजा
  27. ध – धनवान – धन
  28. न – नळ – नभ
  29. प – पपई – पण
  30. फ – फणस – फलक
  31. ब – बदक – बरणी
  32. भ – भटजी – भर
  33. म – मगर – मऊ
  34. य – यज्ञ – यम
  35. र – रवी – रजनी
  36. ल – लसूण – लय
  37. व – वजन – वन
  38. श – शरद – शनी
  39. ष – षटक – षडानन
  40. स – ससा – समई
  41. ह – हमाल – हत्ती
  42. क्ष – क्षण – क्षय
  43. ज्ञ – ज्ञान – ज्ञात

5. खालील सूचनांचा वापर करून त्याप्रमाणे उत्तर लिहा.

प्रश्न (अ)
अकारान्ती शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य बनवा.
जसे – कलम गवत बघ
उत्तरः
1. नयन कमळ बघ.
2. अमय बडबड कर.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

प्रश्न (ब)
अनुस्वार असलेले शब्द लिहा. जसे – अंगठा
उत्तर:

  1. अंगठी
  2. गंमत
  3. बंदूक
  4. अंधार
  5. अंग
  6. कंद

प्रश्न (क)
औकारान्ती शब्द लिहा. जसे – गौतम
उत्तरः

  1. औषध
  2. औत
  3. कौल
  4. नौका
  5. चौदा
  6. सौदा

प्रश्न (ड)
आकारान्ती शब्द लिहा. जसे – गाजर
उत्तर:

  1. मानव
  2. नाक
  3. घार
  4. आसन
  5. भारत
  6. राक्षस

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

प्रश्न (इ)
इकारान्ती पाच शब्द लिहा. जसे – इमारत, शिक्षक
उत्तर:

  1. किडा
  2. फिका
  3. इमानदार
  4. मिठाई
  5. इजा
  6. विनय

प्रश्न (ई)
दीर्घ वेलांटीचे शब्द लिहा. जसे – गाडी
उत्तर:

  1. झाडी
  2. माती
  3. गादी
  4. काडी
  5. आरती
  6. गाडी

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 3 खेळूया शब्दांशी

प्रश्न 6.
वरील गोलांमध्ये वेगवेगळे शब्द लपले आहेत. ते शोधून काढा व लिहा.
उत्तर:
चपाती, पोती, पाव, चव, पाती, पाच.

खेळूया शब्दांशी Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

हा एक शब्दपट आहे. चित्र व शब्द यांची सांगड घालत पट पूर्ण करण्यास सांगितले आहे. या पाठातून मुलांना स्वर व व्यंजन यांची ओळख होते, तसेच चित्रातून ते समजण्यास सोपे जाते.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11 इंधनबचत Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 11 इंधनबचत

5th Standard Marathi Digest Chapter 11 इंधनबचत Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
हा संवाद कोठे झाला?
उत्तरः
हा संवाद स्वयंपाकघरात झाला.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत

प्रश्न (आ)
संवादात किती पात्रे आहेत?
उत्तरः
या संवादात दोन पात्रे आहेत.

प्रश्न (इ)
दिनूला कशाचे महत्त्व पटले?
उत्तरः
दिनूच्या इंधन बचतीचे महत्त्व पटले.

2. खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.

प्रश्न 1.
खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत 1
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत 2
उत्तर:
इंधन बचतीचे मार्गः

  1. पाणी तापवण्यासाठी सौरउर्जेचा वापर करा.
  2. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करा.
  3. अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवा.
  4. जवळपास जायचे असल्यास व घाई नसल्यास कुठल्याही वाहनाने न जाता चालत जा.
  5. भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा.
  6. बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलिंडरचे बटण बंद करा.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत

3. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.

प्रश्न 1.
खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत 3
उत्तर:
यांपैकी सौरपेटी व बायोगॅस संयंत्र वापरल्यास सर्वात जास्त इंधन बचत होते.

वाचू आणि हसू.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत 4
सनी: आई, बाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई: अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी: अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 11 इंधनबचत Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा.

  1. इंधन म्हणजे काय?
  2. इंधनाशिवाय चालणारे दुचाकी वहान कोणते?
  3. पूर्वी आगगाडी कशावर चालत असे?
  4. पूर्वी लोकं जेवण कशावर बनवत असत?
  5. Solar Energy ला मराठीत काय म्हणतात?

उत्तरः

  1. जळण
  2. सायकल
  3. कोळशावर
  4. चुलीवर
  5. सौर उर्जा

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत

1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
कोणाची आई आजारी होती?
उत्तरः
दिनूची आई आजारी होती.

प्रश्न 2.
दिनू आईसाठी काय बनवत होता?
उत्तरः
दिनू आईसाठी चहा बनवत होता.

प्रश्न 3.
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते?
उत्तरः
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव फातिमा होते.

प्रश्न 4.
फातिमाने कशासाठी नकार दिला?
उत्तरः
फातिमाने चहा घेण्यासाठी नकार दिला.

प्रश्न 5.
योग्य गोष्टींसमोर (✓) अशी खूण व अयोग्य गोष्टींसमोर (✗) अशी खूण करा.
उत्तरः

  1. झाडे तोडणे [✗]
  2. सायकलवरून प्रवास करणे [✓]
  3. कारखान्यातील धूर हवेत सोडणे [✗]
  4. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करणे [✓]
  5. पाणी तापवण्यासाठी बंबाचा उपयोग करणे [✓]
  6. अन्न शिजविण्यासाठी सौरचूल वापरू नये [✗]

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत

प्रश्न 6.
खालील चित्रे पहा व योग्य जोड्या लावा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत 5
उत्तरः
(1 – क) (2 – ड) (3 – ब) (4 – अ)

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
फातिमाने दिनूला इंधनाची बचत कशी करायला सांगितली?
उत्तरः
एक कप चहासाठी जर मोठ्या पातेल्याऐवजी लहान पातेले घेतले तर पाणी लवकर उकळते आणि गॅसचीही बचत होते, चहाही लवकर होतो, असे म्हणून फातिमाने दिनूला इंधनाची बचत करायला सांगितली.

प्रश्न 2.
तुमची आई घरात इंधनाची बचत कशाप्रकारे करते ते लिहा.
उत्तरः
आई वरण भात करताना प्रेशर कुकरचा वापर करते. भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते. उगाचच गॅस चालू ठेवत नाही. बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचे बटण बंद करते.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. आई
  2. दार
  3. छोटं
  4. पाणी
  5. इंधन
  6. लक्ष

उत्तर:

  1. माता
  2. दरवाजा
  3. लहान
  4. जल
  5. सरपण
  6. ध्यान

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. आजारी
  2. उघड
  3. बिघाड
  4. छोटा
  5. लक्ष

उत्तर:

  1. निरोगी
  2. बंद
  3. दुरुस्ती
  4. मोठा
  5. दुर्लक्ष

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. स्वयंपाकघर
  2. दार
  3. घर
  4. पातेली

उत्तर:

  1. स्वयंपाकघरे
  2. दारे
  3. घरे
  4. पातेल

प्रश्न 4.
लिंग बदला.

  1. आई
  2. वर्गमैत्रिण
  3. मुलगा

उत्तर:

  1. वडील
  2. वर्गमित्र
  3. मुलगी

इंधनबचत S-ummary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘इंधन बचत’ या पाठात दिनूची वर्गमैत्रीण फातिमा त्याला इंधनबचतीचे महत्त्व व इंधनाची बचत कशाप्रकारे करायची ते समजावून सांगत आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 11 इंधनबचत

शब्दार्थ:

  1. इंधन – जळण (fuel)
  2. चहा – एक प्रकारचे पेय (tea)
  3. पातेले – लहान आकाराचे भांडे (a small utensil)
  4. आजारी – रुग्ण (sick)
  5. दार – दरवजा (door)
  6. वर्गमैत्रीण – वर्गातील मैत्रीण (a classmate)
  7. घर – सदन (home)
  8. उकळणे – कढवणे (to boil)
  9. समजणे – आकलन (to understand)
  10. लक्षात येणे – समजणे (to realise)
  11. ओतणे – (to pour)
  12. स्वयंपाकघर – स्वयंपाकाची खोली (kitchen)

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 1 नाच रे मोरा

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 1 नाच रे मोरा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 1 नाच रे मोरा

5th Standard Marathi Digest Chapter 1 नाच रे मोरा Textbook Questions and Answers

1. ऐका. म्हणा.

प्रश्न 1.
ऐका. म्हणा.

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच!

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ।। 1 ।।

झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ
काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच ।। 2 ।।

थेंब थेंब तळ्यात नाचती रे
टप्टप् पानात वाजती रे
पावसाच्या रेघात
खेळ खेळू दोघांत
निळ्या सौंगड्या नाच ।। 3 ।।

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ।। 4 ।।

– ग. दि. माडगूळकर

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 1 नाच रे मोरा

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 1 नाच रे मोरा Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा.

  1. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?
  2. मोर कुठे नाचणार आहे?
  3. वारा कोणाशी झुंजत आहे?
  4. ढगाला कशाची उपमा दिली आहे?
  5. कोण टाळी देते?
  6. धार कशी झरत आहे?
  7. तळ्यात कोण नाचतात?
  8. पानावर टपटप कशाचा आवाज येतो?
  9. सवंगडी कोणत्या रंगाचा आहे?
  10. पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागले?

उत्तर:

  1. मोर
  2. आंब्याच्या वनात
  3. ढगांशी
  4. काळ्या कापसाची
  5. वीज
  6. झरझर
  7. थेंब
  8. थेंबांचा
  9. निळ्या
  10. सातरंगी कमान

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 1 नाच रे मोरा

2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?
उत्तर:
प्रस्तुत कवितेत पावसाळ्याचे वर्णन केले आहे.

प्रश्न 2.
प्रस्तुत कविता कोणी लिहिली आहे?
उत्तर:
प्रस्तुत कविता ‘ग. दि. माडगूळकरांनी’ लिहिली आहे.

प्रश्न 3.
कवी मोराला कशाप्रकारे नाचण्यास सांगत आहे?
उत्तर:
कवी मोराला पिसारा फुलवून नाचण्यास सांगत आहे.

प्रश्न 4.
झाडांची इरली कशामुळे भिजली आहे?
उत्तर:
झाडांची इरली झर झर धार झरल्यामुळे भिजली आहे.

प्रश्न 5.
कवी कोणाबरोबर खेळ खेळणार आहे?
उत्तर:
कवी निळ्या सवंगड्यांबरोबर खेळ खेळणार आहे.

प्रश्न 6.
कवी मोराला कशाखाली नाचण्यास सांगत आहेत?
उत्तर:
कवी मोराला आभाळातील सातरंगी कमानीखाली नाचण्यास सांगत आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 1 नाच रे मोरा

प्रश्न 7.
इंद्रधनुष्यातील सात रंग कोणते?
उत्तर:
तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे इंद्रधनुष्यातील सात रंग आहेत.

3. कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा.
(रिमझिम, कमान, कापूस, धार, सौंगड्या, जोडी, इरली, तळ्यात, पानात)

  1. काळा काळा ……………….. पिंजला रे.
  2. झर झर …………………. झरली रे.
  3. झाडांची भिजली ……………….. रे.
  4. थेंब थेंब ……………………. नाचती रे.
  5. टप्टप् …………………. वाजती रे.
  6. निळ्या ……………………. नाच.
  7. पावसाची …………….. थांबली रे.
  8. तुझी माझी ………………….जमली रे.
  9. आभाळात छान छान सात रंगी …………………….. .

उत्तरः

  1. कापूस
  2. धार
  3. इरली
  4. तळ्यात
  5. पानात
  6. सौंगड्या
  7. रिमझिम
  8. जोडी
  9. कमान

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 1 नाच रे मोरा

4. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
1. ढगांशी वारा झुंजला रे
…………………. पिंजला रे
2. थेंब थेंब तळ्यात नाचती रे
……………………….. वाजती रे
3. पावसाची रिमझिम थांबली रे
…………………………… जमली रे
4. आभाळात छान छान
…………… कमानीखाली त्या नाच।
उत्तर:
1. काळा काळा कापूस
2. टपटप पानात
3. तुझी माझी जोडी
4. छान छान सात रंगी कमान

5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
आकाशात काळे काळे ढग जमा झाले आहेत. वारा सुटला आहे. वीज चमकत आहे. झर झर पावसाची धार पडत आहे. झाडांची इरली भिजली आहे. पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. पावसाच्या थेंबांचा पानांवर पडून टप्टप् असा आवाज येत आहे. आकाशात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 1 नाच रे मोरा

प्रश्न 2.
प्रस्तुत कवितेत आभाळाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
पाऊस सुरू होण्यापूर्वी आभाळात काळा काळा कापूस पिंजावा तसे काळे ढग जमा झाले आहेत व वीज कडाडते आहे. तसेच पावसाची रिमझिम थांबल्यावर आभाळात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवितेत आभाळाचे वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 9 सिंह आणि बेडूक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

5th Standard Marathi Digest Chapter 9 सिंह आणि बेडूक Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
ऐका, वाचा, लक्षात घ्या.
एका …………………. एक राहायचा. त्याला त्या ……………………. कंटाळा आला आणि तो नव्या …………………. राहायला गेला. एकदा ……………… मोठ्याने गरजला. त्या …………….. अनेक ………………… तसेच काही बेडूकही राहात होते. त्यांनी यापूर्वी …………….. पाहिले नव्हते. त्यांचा ……………….. पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आज काढतो. ..मोठा आवाज काढला. …………… हा आवाज नवीन होता …………………. वाटले, कोणीतही आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. ……….. आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला ……………………. मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. ……………….. त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. ………………. वेगाने पुढे सरकला ……………….. डोक्यावर पाय दिला गयावया करू लागला. ……………………….. त्याला सोडून दिले.
उत्तर:
एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहात होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आज काढतो.

बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले, कोणीतही आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

1. या गोष्टीतील प्राण्यांची नावे लिहा.

प्रश्न 1.
या गोष्टीतील प्राण्यांची नावे लिहा.
उत्तरः
सिंह, बेडूक.

2. सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा.

प्रश्न 1.
सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा.
उत्तरः
सिंह

3. खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते कंसातून शोधून लिहा.

प्रश्न 1.
गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या. आवाज काढून दाखवा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक 1
उत्तरः

  1. डरकाळी
  2. भुंकणे
  3. चीत्कार
  4. म्याँव – म्याँव
  5. हंबरणे
  6. बें-बें
  7. खिंकाळणे
  8. कुईकुई

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा.
(अ) वाघाची – डरकाळी
(आ) हत्तीचा – चीत्कार
(इ) गाईचे – हंबरणे
(ई) बकरीचे – बें-बें
(उ) घोड्याचे – खिंकाळणे
(ऊ) कुत्र्याचे – भुंकणे

चित्रसंदेश:

1. ऐका, वाचा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक 2

2. वाचा. लक्षात ठेवा.
वरील संदेशात ‘पाटी’ हा शब्द दोन अर्थांनी आला आहे.
पाटी – 1. टोपली. 2. ज्यावर लिहिले जाते ती.
संदेश – मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.

  1. सिंहाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात?
  2. सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतात?
  3. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात?
  4. पाठातील सिंह कोठे राहत होता?
  5. बेडूक कसा ओरडतो?
  6. कोणी आपली गर्जना थांबवली?
  7. सिंहाने कोणाला सोडून दिले?

उत्तरः

  1. गुहा
  2. गर्जना
  3. छावा
  4. जंगलात
  5. डराव डराव
  6. सिंहाने
  7. बेडकाला

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
सिंह नव्या जंगलात राहायला का गेला?
उत्तरः
सिंहाला जुन्या जंगलात राहायचा कंटाळा आला होता.

प्रश्न 2.
जंगलात कोण-कोण राहत होते?
उत्तर:
जंगलात पशु-पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते.

प्रश्न 3.
बेडकांचा पुढारी काय म्हणाला?
उत्तर:
कुणीतरी मोठा आवाज काढत आहे. मीही त्याच्याप्रमाणेच मोठा आवाज काढतो, असे बेडकांचा पुढारी म्हणाला.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

प्रश्न 4.
बेडूक गयावया का करू लागला?
उत्तर:
सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला, म्हणून बेडूक गयावया करू लागला.

प्रश्न 5.
सिंहाने आपली गर्जना का थांबवली?
उत्तर:
कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आपण वेळीच सावध व्हावं, या विचाराने सिंहाने आपली गर्जना थांबवली.

प्रश्न 6.
बेडकाने या अगोदर कोणाला पाहिले नव्हते?
उत्तर:
बेडकाने या अगोदर सिंहाला पाहिले नव्हते.

3. थोडक्यात उत्तर लिहा.

प्रश्न 1.
सिंह व बेडकाच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते लिहा.
उत्तरः
स्वत:ची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये, त्याने आपलेच नुकसान होते हे सिंह व बेडकाच्या गोष्टीतून शिकलो.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

प्रश्न 2.
खाली दिलेल्या चित्रांसाठी कंसातील शब्द वापरूनकथा पूर्ण करा. (मुलगा, म्हाताऱ्या आजीबरोबर, झोपडीत, वर्तमानपत्रे, बागेला, म्हातारी आजी, भांडी, पाकीट, वर्गशिक्षकांकडे, पोलीस स्टेशनला, पोलीसांनी, फोन, पाकिट मालकाने, बक्षीस)
सदा नावाचा एक होता. तो एका राहत होता. त्याला अभ्यास करणे खूप आवडायचे. काही झाले तरी भरपूर शिकायचे, असे त्याने ठरवले. सदा रोज सकाळी टाकायला जायचा. संध्याकाळी दोन घरी पाणी घालायचा. चार घरची घासायची. एक दिवस सदा दुपारी शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक सापडले. सदाने ते पाकीट जसेच्या तसे दिले. शिक्षकाने ते पाकीट बघितले. त्यावर मालकाचा पत्ता, नाव होते. शिक्षक सदाबरोबर गेले व ते पाकीट पोलिसांना दिले. लगेच फोन करून मालकाला बोलावले. व त्यांचे पाकीट त्यांना परत देऊन टाकले. सदाला शाबासकी दिली. त्याला दिले व सदाची शिक्षणाची सर्व जबाबदारी धनिकाने स्विकारली. त्यामुळे सदाचे स्वप्न पूर्ण झाले.
उत्तरः
सदा नावाचा एक मुलगा होता. तो म्हाताऱ्या आजीबरोबर एका झोपडीत राहत होता. त्याला अभ्यास करणे खूप आवडायचे. काही झाले तरी भरपूर शिकायचे, असे त्याने ठरवले. सदा रोज सकाळी वर्तमानपत्रे टाकायला जायचा. संध्याकाळी दोन घरी बागेला पाणी घालायचा.म्हातारी आजी चार घरची भांडी घासायची. एक दिवस सदा दुपारी शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक पाकीट सापडले. सदाने ते पाकीट जसेच्या तसे वर्गशिक्षकांकडे दिले.

शिक्षकाने ते पाकीट बघितले. त्यावर मालकाचा पत्ता, नाव होते. शिक्षक सदांबरोबर पोलीस स्टेशनला गेले व ते पाकीट पोलिसांना दिले. पोलीसांनी लगेच फोन करून मालकाला बोलावले. व त्यांचे पाकीट त्यांना परत देऊन टाकले. पाकिट मालकाने सदाला शाबासकी दिली. त्याला बक्षीस दिले व सदाची शिक्षणाची सर्व जबाबदारी धनिकाने स्विकारली. त्यामुळे सदाचे स्वप्न पूर्ण झाले.

प्रश्न 3.
खालील चित्र पाहा व कंसात दिलेल्या योग्य शब्दांची जोडी वापरून चित्राखाली दिलेले संदेश पूर्ण करा.
(वृक्ष – शान, प्लॅस्टीकची पिशवी – कापडी पिशवी, वेगाला – जीवाला, इंधनाची – देशाची, कचरा – आरोग्याची)
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक 3
उत्तरः

  1. प्लॅस्टीकची पिशवी – कापडी पिशवी
  2. इंधनाची – देशाची
  3. कचरा – आरोग्याची
  4. वृक्ष – शान (५) वेगाला – जीवाला

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. जंगल
  2. सिंह
  3. नवे
  4. पशू
  5. पक्षी
  6. आवाज
  7. शांत
  8. कंटाळा
  9. पुढारी
  10. पाय
  11. सावध
  12. बेडूक

उत्तर:

  1. वन, रान
  2. वनराज
  3. नूतन
  4. प्राणी, जनावरे
  5. खग, विहंग
  6. ध्वनी
  7. निमूट
  8. आळस
  9. नेता
  10. चरण
  11. सज्ज
  12. मंडूक

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. कंटाळा
  2. नव्या
  3. पूर्वी
  4. सावध
  5. एक
  6. पुढारी
  7. शांत
  8. वेगाने
  9. पुढे
  10. मोठा
  11. उत्साह

उत्तरः

  1. उत्साह
  2. जुन्या
  3. आता
  4. बेसावध
  5. अनेक
  6. जनता
  7. अशांत
  8. सावकाश
  9. मागे
  10. लहान
  11. निरुत्साह

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. जंगल
  2. एक
  3. आव्हान
  4. गर्जना

उत्तर:

  1. जंगले
  2. अनेक
  3. आव्हाने
  4. गर्जना
  5. पाव

सिंह आणि बेडूक Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

आपली मर्यादा ओळखून आपण पुढे सरकावे. स्वत:ची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये. त्याने आपलेच नुकसान होते, या अर्थाची कथा या पाठात सांगितली आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक

शब्दार्थ:

  1. जंगल – वन (forest)
  2. कंटाळा – निरसता (bore)
  3. गरजणे – गर्जना करणे (To roar)
  4. बेडूक – मंडूक (a frog)
  5. आव्हान – मुकाबला करण्यासाठी आमंत्रण देणे (a challenge)
  6. पुढारी – नेता (a leader)
  7. संतुष्ट – समाधानी (satisfied)
  8. सरकणे – पुढे जाणे (To move on)
  9. आवाज – ध्वनी (sound)
  10. सावध – जागरुक (alert)
  11. शांत – शांतता (calm)
  12. गयावया – दीनवाणी प्रार्थना (to plead)
  13. वेग – गती (speed)
  14. नवीन – नूतन (recent, new)

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 2 हत्तीचे चातुर्य Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

5th Standard Marathi Digest Chapter 2 हत्तीचे चातुर्य Textbook Questions and Answers
1. पाहा. ऐका. वाचा.

प्रश्न 1.
पाहा. ऐका. वाचा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 1उत्तर:

  1. जसे : मुले मैदानात फुटबॉल खेळत आहेत.
  2. मला फुटबॉल खेळायला खूप आवडते.
  3. ससे बसले आहेत.
  4. पावसात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी भरले.
  5. आईने फळीवर डबा ठेवला.
  6. हत्ती नदीवर आंघोळ करत होता.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

2. पाहा. सांगा.

प्रश्न 1.
पाहा. सांगा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 2
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 3
उत्तर:
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 4
एकदा एका मैदानात काही मुले फुटबॉल खेळत होती. या मुलांचा हा खेळ तीन ससे पाहत होते. या मुलांचे खेळून झाल्यावर त्या तीन सशांनी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. खेळता खेळता अचानक त्यांचा फुटबॉल एका मोठ्या खड्ड्यात गेला. ससे विचारात पडले. आता हा फुटबॉल कसा काढावा बरं? त्यांनी एक युक्ती लढवली व एक फळी आणली ती फळी खड्ड्यात घातली, पण तो बॉल काही वर आला नाही. एक हत्ती हे सगळं पाहत होता. सशांच्या धडपडीची त्याला गंमत वाटली व दया आली. त्याने सोंडेत पाणी भरून ते पाणी खड्ड्यात सोडले. त्याबरोबर फुटबॉल वर आला. हत्तीने आपल्या सोंडेने फुटबॉल काढला. ससे पुन्हा आनंदाने खेळू लागले. हत्तीच्या चातुर्यामुळे त्यांना फुटबॉल परत मिळाला. तात्पर्य – सयमसुचकता (Sense of presence) दाखवली तर अडचणीतून मार्ग निघतो.

प्रश्न 1.
सुरुवातीला दिलेल्या चित्रांवालील नावे सांगा.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

प्रश्न 2.
प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.

प्रश्न 3.
चित्र पाहा. कोण ते सांगा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 5
(अ) खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे –
(आ) सशांना मदत करणारा –
उत्तर:
(अ) ससे
(आ) हत्ती

प्रश्न 4.
गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काटा.

प्रश्न 5.
सर्व चित्रे पाहा व गोष्ट सांगा.

प्रश्न 6.
घ,ठ, थाप या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांपासून तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 6

1. शब्द ओळखा व कार्यावर लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 7
उत्तर:
(अ) वेगळा
(ब) बगळा

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 8
उत्तर:
(अ) गाजर
(ब) मांजर

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 9
उत्तर:
(अ) मगर
(ब) नगर

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 10
उत्तर:
(अ) कडक
(ब) भडक

प्रश्न 5.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 11
उत्तर:
(अ) सामान
(ब) कमान

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

प्रश्न 6.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 12
उत्तर:
(अ) वाटाणा
(ब) फुटाणा

प्रश्न 7.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 13
उत्तर:
(अ) आकाश
(ब) प्रकाश

प्रश्न 8.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 14
उत्तर:
(अ) फाटके
(ब) तुटके

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य Additional Important Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
चित्रात किती ससे आहे?
उत्तर:
चित्रात तीन ससे आहेत.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

प्रश्न 2.
चित्रात मुले कोणता खेळ खेळत आहेत?
उत्तर:
चित्रात मुले फुटबॉल खेळत आहेत.

प्रश्न 3.
मुले फुटबॉल खेळताना त्यांच्याकडे कोण पाहत आहे?
उत्तरः
मुले फुटबॉल खेळताना त्यांच्याकडे ससे पाहत आहेत.

प्रश्न 4.
खेळत असतांना फुटबॉल कुठे गेला?
उत्तर:
खेळ खेळता खेळता फुटबॉल खड्ड्यात गेला.

प्रश्न 5.
ससे फुटबॉल कशाप्रकारे बाहेर काढत आहेत?
उत्तर:
ससे फळीने फुटबॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रश्न 6.
फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी कोणी प्रयत्न केला?
उत्तर:
फुटबॉल बाहेर काढण्यासाठी शेवटी हत्तीने प्रयत्न केला.

प्रश्न 7.
हत्तीने खड्ड्यात पाणी कशातून टाकले?
उत्तर:
हत्तीने खड्ड्यात पाणी सोंडेतून टाकले.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

प्रश्न 8.
खड्ड्यात पाणी टाकल्याने काय झाले?
उत्तर:
खड्ड्यात पाणी टाकल्याने फुटबॉल वर आला.

प्रश्न 9.
सशांना केव्हा आनंद झाला?
उत्तर:
फुटबॉल खड्ड्यातून वर आल्याने सशांना आनंद झाला.

प्रश्न 10.
शक्तिपेक्षा काय श्रेष्ठ असते?
उत्तर:
शक्तिपेक्षा युक्ति श्रेष्ठ असते.

2. पुढील दिलेली चित्रे पाहून कोण ते लिहा.

प्रश्न 1.
पुढील दिलेली चित्रे पाहून कोण ते लिहा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 15
1. मुलांचा खेळ पाहून फुटबॉल खेळणारे –
2. सोंडेने खड्ड्यात पाणी सोडणारा –
उत्तर:
1. ससे
2. हत्ती

प्रश्न 2.
पुढील मुद्द्यांच्या व चित्रांच्या मदतीने गोष्ट तयार करून लिहा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 16
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य 17
उत्तर:
मुंगी ……….. कबुतर मैत्री …………. एक दिवस मुंगी पाण्यात ………………. कबुतराने पान टाकणे . मुंगीचे पानावर चढणे ………….. प्राण वाचणे ………. जाणीव एके दिवशी जंगलात शिकारी …………….. कबुतराच्या शिकारीचा नेम …………… मुंगीचा शिकाऱ्याच्या पायाला चावा ……त्याचा नेम चुकणे ………….. कबुतराचे प्राण वाचणे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 2 हत्तीचे चातुर्य

कथा (खरे मित्र):

एकदा एका जंगलात मुंगी-कबुतराची मैत्री झाली. मुंगी पाणी पीत असताना पाय घसरून पडली. कबुतराने लगेच झाडाचे पान टाकून तिला वाचवले. मुंगीला या गोष्टीची जाणीव होती की कबुतरामुळेच आपले प्राण वाचले, नाहीतर आपण बुडून मरून गेलो असतो. एके दिवशी त्याच जंगलात एक शिकारी आला. शिकाऱ्याने इकडे-तिकडे पाहिले. त्याला एका झाडावर कबुतर दिसले. त्याच्या मनात कबुतराची शिकार करावी असे आले. शिकाऱ्याने लगेचच नेम धरला व बंदूकीने गोळी कबुतराला मारणार इतक्यात मुंगीचे लक्ष शिकाऱ्याकडे गेले. मुंगीला काय करावे सुचेना. अखेरीस मुंगीने शिकाऱ्याच्या पायाचा कडकडून चावा घेतला. त्याचा नेम चुकला व अशात-हेने कबुतराचे प्राण वाचले. कबुतर व मुंगी आता खूपच चांगले मित्र झाले.

तात्पर्य:

1. आपल्यावर उपकार करणाऱ्याला कधी विसरू नये.
2. खरे मित्र संकटकाळात एकमेकांची मदत करतात.

हत्तीचे चातुर्य Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

प्रस्तुत पाठात चित्ररूपाने आलेल्या कथेत हत्तीने दाखवलेल्या समयसुचकतेचे व चातुर्याचे वर्णन केले आहे.

शब्दार्थ/Meanings:

  1. हत्ती – गज (an elephant)
  2. चातुर्य – हुशारी (cleverness)
  3. मुले – बालके (children)
  4. फुटबॉल – (name of outdoor game)
  5. ससा – (rabbit)
  6. खड्डा – जमिनीचा खचलेला भाग (a hole, pit)
  7. फळी – लाकडाचा तुकडा (a bat, board, plank)
  8. सोंड – (Trunk)
  9. विचारात पडणे – (think deeply)
  10. युक्ति – (idea)
  11. निराश – उदास (nervous)
  12. आनंद – खुशी (happiness)