Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय – 2

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय Textbook Questions and Answers

1. चित्र पाहा. संवाद वाचा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय

  • आई: अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग?
  • जॉर्डन: आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं?
  • आई: मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत. त्यांचा पुरेपूर वापर करावा.
  • जॉर्डन: अगं हो, पण आता काय करू ते सांग ना!
  • आई: यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत, ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे फाटले आहेत ते वेगवेगळे कर. जॉर्डन:
  • आई: आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का?
  • आईः हो, नक्कीच. त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे.
  • जॉर्डन: आई, काय काय बनवता येईल गं या कपड्यांचं?
  • आईः तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया. (आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते.)
  • जॉर्डन: आई, किती छान झाल्यात गं या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच, आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय

विचार करा. सांगा.

प्रश्न 1.
आपल्याला लहान झालेले, पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता?
उत्तर:
मला लहान झालेले कपडे मी माझ्या घरी काम करणाऱ्या शांता मावशींच्या मुलांना देते. कधी कधी असे कपडे जमा करून मी अनाथ आश्रमातही पोहचवते.

प्रश्न 2.
जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हांला वाटते?
उत्तरः
जुन्या कपड्यांपासून पर्स, तोरण, पायपुसणी, सतरंजी, गोधडी, उशांचे अभ्रे, नवीन कपडे बनविता येतील.

प्रश्न 3.
आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील, असे तुम्हांला वाटते?
उत्तरः
आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे अनावश्यक कपड्यांची गर्दी होणार नाही. पैशांची बचत होईल, जागेचीही
बचत होईल व वेळेचीही बचत होईल.

शिक्षकांसाठी:

विदयार्थ्यांकडून वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंपासून विविध कल्पक वस्तू तयार करून घ्याव्यात. त्या वस्तू तयार केल्यानंतर त्यांचे अनुभव वर्गात सादर करून घ्यावे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय

Class 7 Marathi Chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
कपड्यांप्रमाणे इतर कोणत्या गोष्टींचा अतिरेक टाळता येऊ शकतो?
उत्तरः
कपड्यांप्रमाणेच वह्यांचा अतिरेक पाने कमीत कमी वापरून टाळता येऊ शकतो. बाहेरच्या खाण्यावरही मर्यादा आणून आपण पैशांचा व आपल्या आरोग्याचा अपव्यय टाळू शकतो.

शब्दार्थ:

  1. पुनर्वापर – (reuse)
  2. अपव्यय – वाया जाणे (wastage)