Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 3 प्रभात Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात (कविता)

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
उत्तरः
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कला-गुणांच्या क्षितिजावर होणार आहे.

प्रश्न आ.
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
उत्तरः
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत तत्त्वांचे गुण रुजतील.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न इ.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
उत्तर:
नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे.

2. गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 1

प्रश्न 1.
गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 1
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 2

3. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण
1. सूर्योदय होऊन सकाळ झाली.
2. नवे युग उजाडले.
3. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
4. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
उत्तरः
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न आ.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे
1. मानवांचे युग.
2. नव्या विचारांचे युग.
3. माणसांच्या प्रगतीचे युग.
4. भेदाभेद नसलेले युग.
उत्तरः
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे भेदाभेद नसलेले युग.

4. योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. नव्या युगाच्या नभात (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
2. प्रतिभेची प्रभात (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे
3.  पायाभरणी अस्तित्त्वाची (इ) नवनिर्मितीची पहाट
4. व्यक्तिमत्त्वाची (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. नव्या युगाच्या नभात (इ) नवनिर्मितीची पहाट
2. प्रतिभेची प्रभात (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा
3.  पायाभरणी अस्तित्त्वाची (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे
4. व्यक्तिमत्त्वाची (अ) व्यक्तित्वाची जडणघडण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

5. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (1) चे उत्तर पहा.

प्रश्न आ.
तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
उत्तर:
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (2) चे उत्तर पहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न इ.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (3) चे उत्तर पहा.

6. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
(अ) नभात –
(आ) मनोहर –
(इ) अस्तित्त्वाची –
(ई) युगात –
उत्तर:
(अ) नभात – प्रभात
(आ) मनोहर – सुंदर
(इ) अस्तित्त्वाची – व्यक्तित्वाची
(ई) युगात – प्रभात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.

प्रश्न अ.
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 3
उत्तर:
(अ) आकाश – [नभ]
(आ) सुगंध – [सुवास]
(इ) सुंदर – [मनोहर]
(ई) शरीर – [तन]

(आ) विशेष्ये व विशेषणांच्या योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न आ.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. भव्य (अ) मन
2. अमूल्य (आ) युग
3.  नवे (इ) शिकवण
4. सुंदर (ई) पटांगण
5. विशाल (उ) जग

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. भव्य (ई) पटांगण
2. अमूल्य (इ) शिकवण
3.  नवे (आ) युग
4. सुंदर (उ) जग
5. विशाल (अ) मन

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

उपक्रम: ‘सुदृढ शरीर’ बनवण्यासाठी खालील मुद्द्यांना अनुसरून माहिती मिळवा व वर्गात त्याचे वाचन करा.
1. व्यायाम
2. सवयी
3. आहार

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Important Additional Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तरः
(i) नव्या युगाच्या नभात पसरलेले – [ज्ञानाचे तेज]
(ii) कलागुणांच्या क्षितिजावरती – [प्रतिभेची प्रभात]

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
प्रतिभेची प्रभात कोणत्या क्षितीजावर उगवली आहे ?
उत्तरः
प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितीजावर उगवली आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न ii.
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण कोणी दिली आहे?
उत्तरः
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण गुरुजनांनी दिली आहे.

प्रश्न 3.
रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरुन कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न i.
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या ……………………….
(नभात, आकाशात, ढगात, मेघात)
उत्तर:
नभात

प्रश्न ii.
कला गुणांच्या क्षितीजावरती ही प्रतिभेची ………………….
(सकाळ, दुपार, प्रभात, संध्याकाळ)
उत्तर:
प्रभात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 4.
खालील पर्यायांपैकी योग्य पर्यायांची निवड करून कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न i.
गुरुजनांची अमूल्य शिकवण या ………………….
(अ) धकाधकीच्या युगात
(आ) धावपळीच्या युगात
(इ) स्पर्धेच्या युगात
(ई) औक्योगिक युगात
उत्तरः
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात

प्रश्न ii.
मिटवून सारे भेद चला रे …………………
(अ) स्पर्धेच्या युगात
(आ) मानवतेच्या युगात
(इ) औक्योगिक युगात
(ई) धकाधकीच्या युगात
उत्तर:
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 5.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 4

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तरः
i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 5

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 6

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 7

प्रश्न 2.
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.

  1. नव्या युगाच्या या आकाशात या ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे.
  2. इथे निरंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आपलेपणाचा, प्रेमाचा सुवास पसरला आहे.
  3. आपल्यातील सारे भेद मिटवून मानवतेच्या युगात सर्वांनी चालू या.

उत्तरः

  1. ‘हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात’
  2. ‘आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर’
  3. ‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पायाभरणी (अ) व्यक्तित्वाची
2. प्रयोगशाळा (आ) तत्त्वांची
3.  रुजवणूक (इ) अस्तित्त्वाची

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पायाभरणी (इ) अस्तित्त्वाची
2. प्रयोगशाळा (अ) व्यक्तित्वाची
3.  रुजवणूक (आ) तत्त्वांची

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
स्पर्धेच्या युगात गुरुजनांची अमूल्य शिकवण मिळाल्यामुळे या जगात वावरताना आमच्या अस्तित्त्वाची जाणीव आम्हांला झाली आहे. येथे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालविली जाते. त्या प्रयोगशाळेत रोज नवनवीन प्रयोग घडत असतात. आणि त्यामुळेच अशा वातावरणात आमचे तन (शरीर) सुदृढ बनले आहे आणि आमच्या मनाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत असे मला वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 2.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
उत्तरः
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात आमचे तन सुदृढ झाले आहे. आमच्या मनाने नवीन विचार स्वीकारले असून त्याची कक्षा रुंदावली आहे. येथे नवीन आदर्श, नवीन मूल्य या तत्त्वांची रुजवणूक झाली आहे. ही नव विचारांची धारा आमच्या नसानसांत व रगारगांत वाहते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमच्या मनात नवीन स्वप्ने व नवीन आशा निर्माण होऊ लागल्या आहेत. हीच आमच्या प्रगतीची नवीन परिभाषा आहे असे मला वाटते.

प्रश्न 3.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
उत्तरः
आपल्या समाजाला लागलेली किड म्हणजे ‘भेदभाव’ होय. समाजातील सर्वच ठिकाणी सर्व प्रकारचा भेदभाव पहावयास मिळतो. त्यामुळे आपल्या समाजाची पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होताना दिसत नाही. माणूस म्हणून घ्यायचे असेल तर समाजातील हा भेदभाव समूळ नष्ट करावा लागेल आणि म्हणून कवी म्हणतात, की परिश्रमाने, अभ्यासाने आपल्या देशाला श्रेष्ठ, प्रगत बनवायचे असेल तर आपण सर्वांनी सारे भेद विसरून मानवतेच्या युगात जायला पाहिजे.

हा मला कळलेला वरील ओळींचा सरळ अर्थ आहे. ‘गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात’ या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तरः नव्या युगाच्या आश्वासक वातावरणात देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्यासाठी येथील गुरुजनांची अमूल्य अशी शिकवण या स्पर्धेच्या युगात महत्त्वाची आहे. अशाप्रकारे कला-गुणांच्या या क्षितीजावरती ही अलौकिक बुद्धिमत्तेची प्रभात झालेली आहे. असा या ओळींचा अर्थ आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 4.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती करा.
उत्तरः
1. कवी/कवयित्रीचे नाव – किशोर बळी
2. कवितेचा रचनाप्रकार – स्फूर्ती काव्य
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रस्तुत कविता किशोर, फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतली आहे.
4. कवितेचा विषय – देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

5. कवितेतून व्यक्त होणारा भाव –
नव्या युगात गुरूजनांच्या अमूल्य शिकवणूकीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. नवीन मूल्यांची, नवीन तत्त्वांची विचारधारा आमच्या नसानसांत वरगारगांत वाहत आहे. सतत अभ्यास करून आपण आपल्या देशला प्रगतीपथावर नेऊया आणि आपल्यातील सर्वप्रकारचा भेदाभेद विसरून नव्या मानवतेच्या युगात आपण प्रवेश करुयात. असा भाव येथे कवी प्रकट करतात.

6. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये –
कवीने आपल्या काव्यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगाचे वर्णन करताना तशीच आवाहनात्मक भाषा वापरली आहे. नभात-प्रभात-युगात, मनोहर-सुंदर-निरंतर, युगात-प्रभात-रगारगांत अशा सारख्या यमक जुळवणाऱ्या शब्दांचा वापर करून कवितेत गेयता आणण्याचा प्रयत्न केला आहे. भव्य-पटांगण, अमूल्य-शिकवण, नवे-युग यांसारखी विशेषणे व विशेष्ये यांचा वापर करून कवितेतून त्या-त्या नामांची भव्यता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

7. मध्यवर्ती कल्पना –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात मुलांपुढे ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. अशा वातावरणात नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी त्यांना मिळत आहेत, अशा वातावरणात मुलांच्या विचाराच्या कक्षा रुंदावत आहेत. नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आजच्या प्रगतीची परिभाषा आहे. सतत अभ्यास, सतत प्रगती करून देशाला प्रगतीपथावर नेऊन सर्वप्रकारचे भेदाभेद मिटवूया असा भाव या कवितेतून कवीने व्यक्त केला आहे.

8. कवितेतून व्यक्त होणारा विचार –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभेद विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

9. कवितेतील आवडलेली ओळ –
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

10. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे –
आजकालची नवी पिढी ही आधुनिक विचारांनी भारलेली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जगाच्या एक पाऊल पुढे टाकणारी अशी आहे. परंतु या पिढीला कोणत्याही गोष्टीची आत्मीयता दिसत नाही. आदर, मान, सन्मान अशा नैतिक मल्यांचा न्हास होताना दिसत आहे. अशा वातावरणात नव्या पिढीला पुन्हा एकदा ही कविता आपल्या गुरुजनांची शिकवण आठवण्यास भाग पाडते.

आपले मन, व्यक्तीत्व कसे विशाल करावे याचे भान कविता करून देते. नव्या पिढीची नवी स्वप्ने, नव्या आशा पूर्ण करायच्या असतील तर त्याला परिश्रम, अभ्यास करावाच लागेल असे ही कविता सांगते. शेवटी आधुनिक विचाराने भारलेले आपण सारा भेद मिटवून माणूसकी फक्त टिकवून ठेवू असे सांगते. म्हणून ही कविता मला आवडते.

11. कवितेतून मिळणारा संदेश –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात तरुण पिढीला स्वत:मधील कलागुण विकसित करण्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण आपल्या गुरूजनांचा मान ठेवून, त्यांच्या शिकवणीने पुढे पुढे वाटचाल करत समाजातील हर प्रकारचा भेद नष्ट करत देशाचे भविष्य उज्ज्वल करुया. असा संदेश या कवितेतून आपणास मिळतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा

प्रश्न 1.
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. अशा या नव्या युगाच्या क्षितिजावरती एका वेगळ्या अलौकिक ज्ञानाची पहाट उगवलेली आहे असे कवीने वेगवेगळ्या अलंकारिक भाषेत प्रगट केलेले दिसते. कवीने येथे निसर्ग व आधुनिक माणूस यांची सांगड घातली आहे.

प्रश्न 2.
भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
कवी या कडव्यात आपल्या काव्यमय चमत्कृतीपूर्ण रचनेने सृष्टीतील विविध घटकांना वेगवेगळी वैशिष्ट्ये लावत आहेत असे दिसते. सृष्टी म्हणजे त्याला भव्य पटांगण वाटते. तेथील झाडे-झुडपे, शेत-मळे, डोंगर-दन्या त्याला बाग-बगीच्या सारखे वाटतात. या बागेत वावरणारे किटक, फुलपाखरे, पशू-पक्षी यांचे अस्तित्व सुंदर भासते.

येथील सर्व सजीव सृष्टीत आपुलकी, आपलेपणा भरल्यासरखा वाटतो आणि त्याच आपुलकीचा सुवास प्रत्येकाच्या मनामनात सतत आहे असे वाटते. या स्पर्धेच्या युगात गुरूजनांनी दिलेल्या शिकवणीला तो मौल्यवान मानतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 3.
पायाभरणी अस्तित्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
या कडव्यातून कवीला वीररसाचा प्रत्यय येताना दिसतो. गुरूजनांनी शिकवलेल्या अमूल्य शिकवणूकीतून या सृष्टीत जेव्हा जन्माला आलो तेव्हा त्याची जाणीव होऊन भूतलावरचे आमचे अस्तित्व कसे व किती आहे हे आम्हांला समजले आहे. त्याचबरोबर या सृष्टीच्या शाळेत अनेक नवे-नवे प्रयोग घडत असतात. त्यामुळे आमची जडण – घडण होते असे कवी सांगतात.

या सर्वांमुळे आमचे शरीर सुदृढ व मन विशाल होत आहे असे कवी वर्णन करतात. तसेच जी विचारसरणी आहे, त्याची जी शिकवण आहे ती आमच्या नसानसांत व रगारगांत वाहते असे म्हणून कवीने वीर रसाचे वर्णन केले आहे.

प्रश्न 4.
नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
कवीने या कडव्यातून, आपल्या रचनेच्या माध्यमातून एक आशा व्यक्त केलेली दिसते. प्रस्तुत कवितेत नवीन स्वप्ने, नवीन आशा स्वत:जवळ बाळगून प्रगतीची जी नवी परिभाषा तयार करण्यात आलेली आहे. तिच्यायोगे आपण परिश्रम व अभ्यास करून आपल्या देशाची प्रगती करूया आपल्या देशाची शान वाढवूया.

आपल्या समाजात पसरलेला जो भेद आहे त्याला हद्दपार करून नव्या मानवतेच्या युगात पदार्पण करू असे कवी सांगतात. या वर्णनावरून कवीच्या मनातील आशावाद व राष्ट्रभक्ती हे दोन गुण प्रकर्षाने निदर्शनास येतात.

प्रभात Summary in Marathi

काव्यपरिचय :

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

The modern era of science and technology has opened new ways of knowledge for young generation. The new generation is getting new opportunities to develop their skills. In this promising atmostphere, the poet has asked everyone to forget differences and take our nation towards success.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

भावार्थ :

हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

हे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या नव्या युगात ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण आकाशात पसरलेला आहे. अशा या युगाच्या क्षितिजावरती कला-गुणांची एका उच्च प्रकारच्या | ज्ञानाची रम्य अशी पहाट उगवलेली आहे.

भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर.

गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

फुला-पाखरांनी भरलेल्या अशा या सुंदर जगात भव्य असे पटांगण आहे. सुंदर अशी बाग आहे. येथील प्रत्येकाच्या मनात आपुलकीचा एक सुंदर सुवास निरंतर पसरलेला आहे. येथील गुरुजनांनी दिलेली शिकवण अमूल्य अशीच आहे. त्या शिकवणूकीची किंमत करता येत नाही. अशा प्रकारे या नव्या कला-गुणांनी भरलेल्या युगाच्या क्षितिजावर एक सुंदर अशी अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन ही पहाट उगवलेली आहे.

पायाभरणी अस्तित्त्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत,
रगारगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

या नव्या युगात गुरुजनांच्या अमूल्य शिकवणीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. येथे आमचे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालते. अशा वातावरणात आमचे शरीर सुदृढ बनले आहे. मन विशाल होत आहे. आमच्या मनाच्या कक्षा रुंदावत आहेत. अशा वातावरणात आमच्यामध्ये आदर्शाची – मूल्यांची रुजवणूकच होत आहे. याच आदर्शाची – मूल्यांची, नवीन तत्त्वांची विचारधाराआमच्या नसानसांत वरगारगांत वाहत आहे. अशा प्रकारे या नव्या युगात कला-गुणांच्या क्षितिजावर अलौकिक बुद्धिमत्तेची (प्रतिभेची) ही नवी पहाट उगवलेली आहे.

नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

या नव्या युगात नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आमच्या प्रगतीची नवी परिभाषा (व्याख्या) आहे. परिश्रम (कष्ट) करून, सतत अभ्यास करून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर | घेऊन जाऊया. आपल्यातील सर्व प्रकारचे भेदाभेद मिटवून नव्या विचारांच्या नव्या मानवतेच्या युगात प्रवेश करूया. अशा प्रकारे कलागुणांच्या या नव्या युगाच्या क्षितीजावर अलौकिक बुद्धिमत्तेची (प्रतिभेची) ही नवी पहाट उगवलेली आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

शब्दार्थ :

  1. तेज – प्रकाश – light
  2. युग – कालखंड – an era
  3. नभ – आकाश, गगन – sky
  4. कलागुण – अंगातील कौशल्य – skill
  5. प्रतिभा – अलौकिक बुद्धिमत्ता – genius
  6. प्रभात – पहाट – dawn
  7. भव्य – उत्तुंग, प्रशस्त – grand
  8. पटांगण – मोठे आवार, मैदान – a big open space, a courtyard
  9. बाग – बगीचा, उदयान – garden
  10. मनोहर – मनोवेधक, आकर्षक- attractive, charming
  11. आपुलकी – जवळीक, जिव्हाळा, आपलेपणा – affection, attachment
  12. सुवास – सुगंध – fragrance
  13. निरंतर – अखंड, नेहमी – always
  14. अमूल्य – बहुमोल, मौल्यवान – precious
  15. तन – शरीर, तनू – body
  16. सुदृढ – सशक्त, बळकट – healthy and strong
  17. नस – शीर, नाडी – vein
  18. रगारगात – पूर्ण शरीरात – in full body
  19. नव – नवीन – new
  20. परिभाषा – व्याख्या – definition
  21. उन्नत – उंच, श्रेष्ठ – raised, eminent

टीप :

क्षितीज – आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती वर्तुळकार मर्यादा.