Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 6 ऐकुया खेळूया Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया

5th Standard Marathi Digest Chapter 6 ऐकुया खेळूया Textbook Questions and Answers

1. ऐका. चित्रे पाहा. कृती करा.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया 1
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया 2

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. 9 वरील चित्र पाहून खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा.

  1. पहिल्या चित्रातील मुलगी काय करताना दिसत आहे ?
  2. दुसऱ्या चित्रातील मुलगा व मुलगी कोणाप्रमाणे उडी मारणार आहेत?
  3. चित्रात किती शंकू आहेत?
  4. कोणासारखे तीन मीटर चाला असे म्हटले आहे?
  5. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

उत्तर:

  1. धावताना
  2. बेडकाप्रमाणे
  3. तीन
  4. हत्तीसारखे
  5. हॉकी

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया

2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
‘ऐकूया, खेळूया’ या पाठात एकूण किती चित्रे आहेत?
उत्तर:
‘ऐकूया, खेळूया’ या पाठात एकूण आठ चित्रे आहेत.

प्रश्न 2.
शाळेच्या मैदानावर काय करण्यास सांगितले आहे?
उत्तर:
शाळेच्या मैदानावर पन्नास मीटर धावण्यास सांगितले आहे.

प्रश्न 3.
एका जागी किती उंच उड्या मारण्यास सांगितल्या आहेत?
उत्तर:
एका जागी पाच उंच उड्या मारण्यास सांगितल्या आहेत.

प्रश्न 4.
चार उड्या कोणत्या प्रकारे मारण्यास सांगितल्या आहेत?
उत्तर:
चार कोलांट्या उड्या मारण्यासांगितल्या आहेत.

प्रश्न 5.
शिडी कुठे ठेवली आहे?
उत्तर:
शिडी जमिनीवर ठेवली आहे.

प्रश्न 6.
जमिनीवरील शिडीतून कसे धावण्यास सांगितले आहे?
उत्तर:
जमिनीवरील शिडीच्या चौकोनातून धावण्यास सांगितले आहे.

प्रश्न 7.
पाठ्यपुस्तकातील चित्रांमध्ये उड्यांचे कोणते प्रकार सांगितले आहेत?
उत्तर:
बेडूक उडी, उंच उडी, कोलांट्या उड्या, दोरी उडी.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया

3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
तुमच्या शाळेच्या क्रीडामहोत्सवात कोणकोणत्या क्रीडास्पर्धांचा समावेश केला जातो?
उत्तर:
कबड्डी, खो-खो, क्रिकेट, धावण्याची शर्यत, लंगडी, गोळा फेक इ.

प्रश्न 2.
नियमित मैदानी खेळ खेळल्याने कोणते फायदे होतात?
उत्तर:
1. नियमित खेळ खेळल्याने शारीरिक व्यायाम होतो.
2. आरोग्य चांगले राहते.

प्रश्न 3.
खालील चित्रे पाहून चित्रातील खेळ ओळखा.
उत्तरः

  1. धावणे
  2. लंगडी
  3. कबड्डी
  4. खो-खो

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. शाळा
  2. मैदान
  3. हत्ती
  4. जमीन
  5. दोरी

उत्तरः

  1. विदयालय, विद्यामंदिर
  2. क्रिडांगण
  3. गज
  4. धरणी
  5. दोर

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. धावणे
  2. जाणे
  3. चालणे
  4. जमीन
  5. एक

उत्तरः

  1. थांबणे
  2. येणे
  3. धावणे
  4. आकाश
  5. अनेक

प्रश्न 3.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. ऐकुया खेळूयामैदान
  2. बेडूक
  3. उड्या
  4. कोलांट्या
  5. शिडी
  6. दोरी

उत्तर:

  1. मैदान
  2. बेडूक
  3. उडी
  4. कोलांटी
  5. शिड्या
  6. दोऱ्या

ऐकुया खेळूया Summary in Marathi

पदयपरिचय:

आजच्या तंत्रयुगात मुलांचा बौद्धिक, सामाजिक विकास तर होत असतोच पण त्याबरोबर मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी ‘ऐकूया, खेळूया’ या पाठातून मैदानी खेळांची ओळख करून दिली आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया

शब्दार्थ:

  1. शाळा – विदयालय (school)
  2. मैदान – क्रिडांगण (ground)
  3. धावणे – पळणे (to run)
  4. बेडूक – (frog)
  5. उड्या – (jump)
  6. शंकू – (cone)
  7. हत्ती – गज (elephant)
  8. चाल – (to walk)
  9. एका जागी – (at one place)
  10. उंच – (high up)
  11. कोलांटी उडी – (upside down jump)
  12. जमिन – धरती (land)
  13. शिडी – जिना (ladder)
  14. दोरीवरील उड्या – एक प्रकारचा खेळ (skiping jumps)